पुस्तके : अनुवादित    
   
 

 

       
 
 

वायपिन व्दीप ते एर्नाकुलम या सायंकालीन समुद्रप्रवासाला-

   

तू लिही कविता
(डॉ. दामोदर खडसे यांच्या 'तुम लिखो कविता' या कवितासंग्रहाचा अनुवाद)

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ : कुणाल खडसे
संस्करण - प्रथम : फेब्रुवारी २०१५
किंमत : १४० रुपये, पृष्ठसंख्या १२०

           
   
 
   
   
तू लिही कविता

तू लिही कविता
मी पाहीन मनभरून
लेखणीतून कागदावर उतरलेलं
जीवनाचं मूक राहिलेलं गाणं..
प्रवासात खूप मागे राहिलेलं
एक नाव हरवलेलं वळण
चिंचेच्या झाडावर
काटला गेलेला पतंग
कबुतरांचा थवा
रस्त्यावर उडणारी धूळ..
मागे वळून पाहत अडखळणारी पावलं
हलणारा हात
थोडी जवळीक… बरचसा दुरावा
आत-बाहेर भिरभिरणार्याद
डोळ्यांच्या बाहुल्यांमधे
केल्या - न केलेल्याची बेचैनी
आत्मघाती घुसमट..
कसा दिग्भ्रसमित करू शकेल कोणी
आपलाच आवाज..

तू लिही कविता
आणि मी पाहीन तुझ्या बोटांमधे
एक अस्वस्थ लेखणी
पाहीन
शब्दांत न्हाऊन निघालेल्या बाहुल्या
डोळ्यांत खोलवर अर्थांच्या रांगा
कपाळावर उमटणार्याघ रेषा
सागरलाटांसारख्या...

तू लिही कविता
आणि मी पाहीन तुला
कविताच होऊन जाताना..!
***
 
हिंदीतील ज्येष्ठ कवी लीलाधर मंडलोई यांची प्रस्तावना

या कवितासंग्रहातील कविता वाचून लक्षात येतं की दामोदर खडसे एक अत्यंत संवेदनशील कवि आहेत. रूढ अर्थाने हा अनेक कविता असलेला एक संग्रह नाही तर ही एक दीर्घ आणि भव्य अशी 'प्रेमकविता' आहे. ही कविता म्हणजे कवितेसाठी कठीण असलेल्या या काळात एक असं आव्हान आहे ज्यात कविता जपण्याचं आमंत्रण आहे. संपूर्ण सृष्टीला केलेली ही एक अद्भुंत प्रेम-प्रार्थना आहे. जीवनातील घटना.. वस्तू.. मूल्यं.. यांना साद घातलीय या कवितेत. मानवी नात्यांतील दुर्मिळ ओलाव्यात बुडालेली ही कविता स्वर, संगीत, रंग, ध्वनी, रूप आणि मौन आपल्या अंतरंगात धारण करण्याचा सार्थक प्रयत्न करते. 'तू लिही कविता' ही पहिली ओळ प्रतिमारूपात पुन्हा पुन्हा सूचित करत राहते की कविताच जीवन वाचवू शकते..!

हे सांगायची गरज नाही की कवि आजच्या हिंसक आणि मूल्यहीन काळाला सामोरं जात कवितेत प्रेम स्थापित करण्याचा प्रयत्न अशा रीतीनं करत असतो की हे जग पुन्हा सुंदर आणि अधिक चांगलं व्हावं. ही पूर्ण कविता जणूकाही एक महाकाव्य रचण्याच्या उंबरठ्यावर स्वतः असण्याचं स्वप्न पाहते आहे.

आजच्या समाजाला कवितेची काही आवश्यकता आहे असं दिसत नसताना दामोदर खडसे, समाजासाठी ती एक अपरिहार्य वरदान आहे असं मानत समाजाची गरज म्हणून कविता सादर करतात. वृक्ष-वेली, नद्या, हवा, सूर्य-चंद्र, तारांगण, आकाश.. यांना कवितेत ते अशासाठी आणतात की त्यांचं एक कवच तयार व्हावं. या कवितेत कोमल भावना आहेत त्याबरोबर जग वाचवण्याची भूमिका निभावू शकतील अशी ही रूपंही आहेत. कवीचा दृढ विश्वास आहे की 'नीरवता आणि कलरव यांच्यामधला / मौन आणि उन्मेष यांच्यामधला / पूल असते कविता'.

कवितेला 'कवच' आणि 'पूल' बनवण्याची बांधिलकी हेच दामोदर खडसे यांचं उद्दिष्ट आहे. त्यांच्या या भूमिकेत एक धोका आहे. चलती असलेल्या साच्यात घडवलेल्या कवितेहून वेगळी, सगळं काही स्वच्छ.. सरळ सांगणारी कविता लिहिण्याची हिम्मत ते करतात. आजच्या काव्य-विश्वात अशा कवितेला मान्यता नाही. पण 'कविता सत्य आणि स्वप्न यांचा अद्भुात संगम आहे', आणि एक 'प्रतिज्ञापत्र'ही... त्यामुळं ही कविता वाचणं हा वाचकांसाठी एक सुखद अनुभव होऊ शकेल. कवीच्या शब्दांत- 'ज्या दिवशी लिहीली जाते कविता / दिवस दिवाळी होऊन जातो.'

   
                   
 


Designed By HSMS