ही अक्षरं नाहीत,
हे शब्द नाहीत,
या कविता नाहीत.

मौनातून उसळून
मौनात विसर्जित होण्यापूर्वी
मध्यसीमेवर अस्तित्वभान देत
निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची
स्मारकं आहेत ही

उभ्या आडव्या रेषा
काही बिंदू , काही वळणं
आणि बरंचसं अवकाश
यांनी घडवलेली !


 
 
     
  आसावरी काकड़े  :













 
बी. कॉम., एम. ए. (मराठी)
एम. ए. (तत्त्वज्ञान)
 

 

 

  'सेतू' , डी-१/३, स्टेट बँक नगर,
कर्वेनगर, पुणे - ४११ ०५२.
मोबाईल : +९१- ९७६२२०९०२८
 
 
     प्रकाशित गद्य लेखन :  

१.


ईशावास्यम् इदं सर्वम्...
एक आकलन-प्रवास
(तत्त्वज्ञान)


जुलै.२०१२ (राजहंस प्रकाशन, पुणे)
 

२.

कवितेभोवतीचं अवकाश (लेखसंग्रह)
 
जाने. २०१२ (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)
 

३.

अथांग - बिंद्या सुब्बा यांच्या 'अथाह' या मूळ नेपाळी कादंबरीचा अनुवाद (हिंदी अनुवादावरून)
 
२०१८ (साहित्य अकादेमी)
 

४.

आनंदी गोपाळ (संक्षिप्त आवृत्ती)
 
डिसेंबर २०१८ (ज्योत्स्ना प्रकाशन, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ)
 
     प्रकाशित कवितासंग्रह :  

१.

आरसा

१९९० (सेतू प्रकाशन, पुणे)
दुसरी आवृत्ती १९९३ (सेतू प्रकाशन, पुणे)
 
 
२. आकाश १९९१ (सेतू प्रकाशन, पुणे)
 
 
३. बालगीत संग्रह
 

* टिक टॉक ट्रिंग - १९९२ (अनुजा प्रकाशन, पुणे)
* अनु मनु शिरु - १९९२ (साकेत प्रकाशन, औरंगाबाद)
* जंगल जंगल जंगलात काय ? - (इसाप गाणी) १९९३
   (सेतू प्रकाशन, पुणे)
* भिंगोऱ्या भिंग २००८ ( कजा कजा मरू प्रकाशन, पुणे)
* ऋतुचक्र २०११ ( कजा कजा मरू प्रकाशन, पुणे)
 

 
४. लाहो १९९५ (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)
 
 
५. मौन क्षणों का अनुवाद १९९७ (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे) (हिंदी कवितासंग्रह)
 
 
६. मी एक दर्शनबिंदू १९९९ (सुमती प्रकाशन, पुणे)
 
 
७. मेरे हिस्से की यात्रा २००३ (सेतू प्रकाशन, पुणे)
(स्वत:च्या निवडक मराठी कवितांचा हिंदी अनुवाद)
 
 
८. बोल माधवी २००४ (सेतू प्रकाशन, पुणे) - (डॉ. चंद्रप्रकाश देवल
यांच्या `बोलो माधवी' या कवितासंग्रहाचा अनुवाद)
दुसरी आवृत्ती २००७ (राजहंस प्रकाशन, पुणे)
 
 
९. रहाटाला पुन्हा गती दिलीय मी २००५ (सेतू प्रकाशन, पुणे)  
१०. स्त्री असण्याचा अर्थ २००६ (सेतू प्रकाशन, पुणे)  
११. उत्तरार्ध २००८ (राजहंस प्रकाशन, पुणे)  
१२. इसीलिए शायद २००९ (सेतू प्रकाशन, पुणे) (हिंदी कवितासंग्रह)
 
 
१३. भेटकार्ड आज तुला हे सांगायलाच हवं - (मिळून साऱ्याजणी मासिकाचं प्रकाशन, पुणे)
शपथ सार्थ सहजीवनाची - (मिळून साऱ्याजणी मासिकाचं प्रकाशन, पुणे)
 
 
१४. तरीही काही बाकी राहील मार्च २०१४ पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
(डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा अनुवाद)
 
 
१५. लम्हा लम्हा जुलै २०१४ डिंपल पब्लिकेशन, मुंबई.
(दीप्ति नवल यांच्या 'लम्हा लम्हा' या हिन्दी कवितासंग्रहाचा अनुवाद)
 
 
१६. तू लिही कविता २०१५ दिलीपराज प्रकाशन, पुणे.
(डॉ. दामोदर खडसे यांच्या 'तुम लिखो कविता' या हिन्दी कवितासंग्रहाचा अनुवाद)
 
 
१७. व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर

मे २०१६ राजहंस प्रकाशन, पुणे.

 

 
१८. भेटे नवी राई

मार्च २०२० सुखायन प्रकाशन, पुणे  

 

 
     पुरस्कार :  

१.

बोल माधवी

साहित्य अकादेमी, नवी दिल्लीचा अनुवाद पुरस्कार २००६.
 
 
२. इसीलिए शायद केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीचा 'हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार'
 
 
३. मेरे हिस्से की यात्रा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कार.
 
 
४. लेखिका पुरस्कार

एकूण लेखनाबद्दल गो.नी.दांडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा कै. शांतादेवी शिरोळे पुरस्कार.

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव चा ‘सूर्योदय काव्य पुरस्कार’

पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्यसम्राट न. चिं केळकर पुरस्कार

'साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे यांचा काव्यविषयक योगदानाबद्दल 'काव्ययोगिनी' पुरस्कार

 
 
५. मी एक दर्शनबिंदू महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार.

आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा साहित्य पुरस्कार
 
 
६. बालसाहित्य परिवर्तन संस्था, औरंगाबादचा कै. ग. ह. पाटील पुरस्कार.
 
 
७. लाहो महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग. दि. मा. पुरस्कार.
 
 
८. आरसा महाराष्ट्र राज्य पुरस्कार.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा
प्रथम पुरस्कार.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा ह. स. गोखले पुरस्कार.

`एकोल' पुरस्कार, अहमदनगर.
 
 
९. ईशावास्यम् इदं सर्वम्... सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा ग. वि. अकोलकर पुरस्कार.
 
 
१०. कवितेभोवतीचं अवकाश आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान, पुणे यांचा केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार.
 
 
     इतर :  

१.

आकाशवाणी, नवी दिल्ली तर्फे आयोजित जयपूर येथील सर्वभाषी कविसंमेलनात
(National Symposium of Poet 2002) मराठीचे प्रतिनिधित्व.
 
 
२. प्रथम वर्ष कला-पुणे विद्यापीठ, तृतीय वर्ष कला - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नासिक, कर्नाटक राज्य, इयत्ता आठवी, महाराष्ट्र राज्य- इयत्ता अकरावी व सातवी या वर्गांसाठी मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश.

गोवा विद्यापीठाच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमात `मराठीतील अनुवादित भारतीय साहित्य' या विषयासाठी नेमलेल्या पाठ्यपुस्तकात `बोल माधवी' या कवितासंग्रहाचा समावेश.
 
 
३. पुस्तक परीक्षण, ललित लेख, कथा इ. गद्य साहित्य विविध नियतकालिकांतून प्रकाशित.
 
 
४. आकाशवाणी, दूरदर्शन व विविध साहित्य संमेलनात कविता विषयक कार्यक्रमात सहभाग.
 
 
५. विविध हिंदी कवितांचा मराठी अनुवाद विविध नियतकालिकांतून प्रकाशित.
 
 
६. `मौन क्षणों का अनुवाद' या हिंदी कवितासंग्रहातील काही कवितांचा पंजाबी, मैथिली भाषेत अनुवाद व काही मराठी कवितांचा राजस्थानी, हिंदी व इंग्रजी भाषेतील अनुवाद `जागती जोत', `भाषा', `भारतीय कविताएँ', `समकालीन भारतीय साहित्य' "Indian Liturature" आणि Continuum 2005 - by Poetry club of India, New Delhi यात प्रकाशित.
 
 
७. पेंग्विन बुक्स द्वारा प्रकाशित `नव्या वाटा, नवी वळणे' या डॉ. निशिकांत मिरजकर यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक मराठी कवींच्या कवितासंग्रहात पाच कविता.
 
 
८. हिंदी साहित्य सम्मेलन, प्रयाग (इलाहाबाद) द्वारा `सम्मेलन सम्मान' २००४
 
 
 
     
   
 
 


Designed By HSMS