ही अक्षरं नाहीत,
हे शब्द नाहीत,
या कविता नाहीत.

मौनातून उसळून
मौनात विसर्जित होण्यापूर्वी
मध्यसीमेवर अस्तित्वभान देत
निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची
स्मारकं आहेत ही

उभ्या आडव्या रेषा
काही बिंदू , काही वळणं
आणि बरंचसं अवकाश
यांनी घडवलेली !


 
 
     
     पुरस्कार  
 
 
१. बोल माधवी साहित्य अकादेमी, नवी दिल्लीचा अनुवाद पुरस्कार २००६.
 
 
२. इसीलिए शायद केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीचा 'हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार'
 
 
३. मेरे हिस्से की यात्रा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कार.
 
 
४. लेखिका पुरस्कार

एकूण लेखनाबद्दल गो.नी.दांडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा कै. शांतादेवी शिरोळे पुरस्कार.

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव चा ‘सूर्योदय काव्य पुरस्कार’

पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्यसम्राट न. चिं केळकर पुरस्कार

साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे यांचा काव्यविषयक योगदानाबद्दल 'काव्ययोगिनी' पुरस्कार


 
५. मी एक दर्शनबिंदू महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार.

आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा साहित्य पुरस्कार
 
 
६. बालसाहित्य परिवर्तन संस्था, औरंगाबादचा कै. ग. ह. पाटील पुरस्कार.
 
 
७. लाहो महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग. दि. मा. पुरस्कार.
 
 
८. आरसा महाराष्ट्र राज्य पुरस्कार.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा
प्रथम पुरस्कार.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा ह. स. गोखले पुरस्कार.

`एकोल' पुरस्कार, अहमदनगर.
 
 
९. ईशावास्यम् इदं सर्वम्... सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा ग. वि. अकोलकर पुरस्कार.
 
 
१०. कवितेभोवतीचं अवकाश आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान, पुणे यांचा केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार.
 
 
 
 


Designed By HSMS