पुस्तके : बाल संग्रह    
   
 

 

       
 
 

  तीन संगीतिका आणि इतर कविता

   

ऋतुचक्र

प्रकाशक : कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन, पुणे
मुखपृष्ठ व आतील चित्रे : रसिका काळे, पुणे
आवृत्ती पहिली : १४ नोव्हे.२०११
किंमत : २५ रुपये, पृष्ठे २०

           
   
 
   
   
उजाडते रोज आपल्याचसाठी
झोप घेण्यासाठी होई रात्र

शेतात पिकते, पाऊस पडतो
पक्षी गाणे गातो आनंदात

नाक घेई श्वास, डोळे पाहतात
कान ऐकतात सारे काही

काही न करता कसे घडे सारे
चंद्र, सूर्य, तारे कुणामुळे?

करूया प्रार्थना नम्र होण्यासाठी
मिळवण्यासाठी नवे बळ !
 

चैत्र म्हणे वसंताला ये रे ये सरला शाप
कोणी नाही करीत आता झाडे तोडून वेडे पाप ॥धृ.॥

वसंताने कोकिळेच्या कानात हेच सांगितले
तिने तर पंचम लावून सार्‍यांनाच कळवले
ये रे ग्रीष्मा हळूहळू फार नको देऊस ताप ॥१॥
कोणी नाही करीत आता झाडे तोडून वेडे पाप !

शहाण्यासारखा वेळेवर ग्रीष्म सुद्धा येऊन गेला
आठवण म्हणून सार्‍यांना वेडी तहान देऊन गेला
सारे समजून मग आला वर्षा ऋतू आपोआप ॥२॥
कोणी नाही करीत आता झाडे तोडून वेडे पाप !

पाऊसधारा गळ्यात घेऊन माती नाचू-गाऊ लागली
शरद ऋतू येईल म्हणून जरा नटून थटून बसली
धरित्रीच्या ओटित आले पुरेपूर भरले माप ॥३॥
कोणी नाही करीत आता झाडे तोडून वेडे पाप !

चिंब ओली वसुंधरा मग खूपच गारठली
हेमंताची चाहूल येताच पुन्हा पुन्हा शहारली
गोठवणारी थंडी म्हणे नका बरं मारू थाप ॥४॥
कोणी नाही करीत आता झाडे तोडून वेडे पाप !

बहर आता झाला जुना तेव्हा आला ऋतू शिशिर
पानगळ म्हणे चला आता नव्या बहरा नको उशीर
ऋतूचक्र फिरत राहो पुन्हा कधीच नको शाप ॥५॥
कोणी नाही करीत आता झाडे तोडून वेडे पाप !

   
                   
 


Designed By HSMS